Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक तासगाव पोलिसांची कारवाई

जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक 
तासगाव पोलिसांची कारवाई 



तासगाव : खरा पंचनामा 

तासगाव शहरातील कॉलेज कॉर्नर येथे जबरदस्तीने मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांचच्याकडून चोरीचे 2 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. 

रुपेश सूर्यकांत राऊत (वय 21), श्वेत सुनील तडसरे (वय 19), विक्रम संजय जाधव (वय 19, तिघेही रा. विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तासगावचे निरीक्षक श्री. भानुदास निंभोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दि. 4 जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास श्रेयस पवार तासगाव येथील कॉलेज कॉर्नर येथे मोबाईलवर बोलत थांबला होता. त्यावेळी तिघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसडा मारून जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले होते. 

पथक चोरट्यांचा शोध घेत असताना यातील संशयित एपीजे मनेराजुरी रस्त्यावर जाताना दिसले. त्यांना अडवून त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल सापडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय कवलापूर येथूनही असाच एक मोबाईल चोरल्याचीही कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मागर्दशर्नाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, अमित परीट, सुनील चौधरी, सुहास खुबेकर, विवेक यादव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.