घरफोड्या करणारा अल्पवयीन ताब्यात, एकजण पसार
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील विश्रामबाग तसेच मिरजेत घरफोड्या करणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. तर एक संशयित पसार झाला आहे. मुलाकडून रोकड, शूज, बॅडमिंटन रॅकेट, ट्रॅव्हल्स बॅग, टी शर्ट, जॅकेट, एक दुचाकी असा ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचे एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
वसीम मेहबूब शेख (बालेखान) (रा. रेवणी गल्ली, मिरज) असे पसार झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी खास पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना दोघेही संशयित चोरीचा माल विक्री करण्यासाठी चोरीच्या दुचाकीवरून असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
पथकाने मिरजेत सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील बॅगेची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ चोरीचे साहित्य आढळले. यावेळी शेख तेथून पळून गेला. बॅगेतील मालाबाबत पथकाने त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आणि वसीम शेख यांनी मिळून मिरजेतील स्पोटर्सचे एक दुकान, सांगलीतील विश्रामबाग येथील दोन दुकाने फोडल्याची कबुली दिली. तसेच सांगलीतील दक्षिण शिवाजीनगर येथून दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.