100 फुटी रोड, सिव्हिल रोडवरील अतिक्रमणावर जेसीबी!
१२० हुन अधिक फलक जप्त : उपआयुक्त वैभव साबळे यांची धडक कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील 100 फुटी रोड, सिव्हिल रोड परिसर मंगळवारी अतिक्रमण मुक्त करण्यात आला. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार सोमवारपासून सुरवात केलेली अतिक्रमणं मोहीम आज दुसऱ्या दिवशी देखील तीव्र केली.
याची सुरुवात उर्वरित 100 फुटी रोडवरून करून सिव्हिल रोड ते सिव्हिल चौकपर्यंत कारवाई करण्यात आली.
या कारवाईत रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवून जप्त करण्यात येत आहेत. कारवाईत १२० हुन अधिक बोर्ड, फलक जप्त करण्यात आले. मनपाचे उपआयुक्त वैभव साबळे यांनी धडक कारवाई करत 100 फुटी रोड सिव्हिल रोड बोर्ड, होर्डिंग, अतिक्रमण मुक्त करण्यास सुरुवात केली.
या कारवाईत सहायक आयुक्त सचिन सागावकर, अतिक्रमण विभागाचे दिलीप घोरपडे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.