राज्यातील 10 पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 10 पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुवात उप अधीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी काढले आहेत.
न्याय निर्णय व आदेश यांच्या आधीन राहून हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पदोन्नती तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी यांना नियमाधीनतेचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क असणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राजेंद्र सांगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे, चंद्रकांत निरावडे यांची पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे येथे, अजय वसावे यांची पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नाशिक ग्रामीण येथे, प्रमोद मकेश्वर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा उपविभाग येथे पदस्थापना करण्यात आली आहे.
सुवर्णा प्रसाद पत्की-कवळेकर यांची पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.. येथे, सुधीर पाटील यांची सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर येथे, सुरेश शिंदे यांची सहायक पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे, रामकृष्ण मळघणे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, किनवट उप विभाग, जि. नांदेड येथे, दादा हरी चौरे यांची सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई येथे पदस्थापना करण्यात आली आहे.
गणपत दराडे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकरदन उप विभाग, जि. जालना येथे पदस्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त दीपक विठ्ठलराव गिऱ्हे यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक येथे बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.