10 हजारांची लाच घेताना एपीआय लाचलूचपतच्या जाळ्यात
भंडारा : खरा पंचनामा
मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाईतून नाव वगळण्यासाठी भंडारा पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकाला 10 हजारांच्या लाच रकमेसह अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
सहायक पोलिस निरीक्षक राजेश साठवणे (45) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी लाच मागितली असल्याची माहिती ज्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली, त्यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार हे 53 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा आणि अन्य तिघांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
मुलगा शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्याच्यावर कारवाई नको, अशी वडिलांची भूमिका होती. मुलाचं नाव त्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.