15 लाखांची लाच घेताना तहसीलदाराला अटक!
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय 44, रा. फ्लॅट नंबर - 604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक ) असे तहसीलदाराचे नाव आहे. गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत नाशिक येथील एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या मालकाने यांच्या जमिनीमध्ये मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपये दंड केल्याबाबत नरेश कुमार यांच्या कार्यालयात आदेश आले होते. आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालकाने थेट प्रांताधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते.
त्याबाबत आदेश होऊन हे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले होते. जमीन मालकाने सांगितल्याप्रमाणे पडताळणीसाठी नरेश कुमार यांनी जमिनीच्या मालकाला राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणसाठी बोलावले होते. परंतु जमिनीचे मालक आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्यावतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिले. तक्रारदार हे तहसीलदार यांनी नरेश कुमार यांची स्थळ निरीक्षण वेळी भेटली घेतली.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली. तहसीलदार नरेशकुमार यांनी लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज स्वीकारल्याने नरेशकुमार तुकाराम बहिरम विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.