Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 18 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

राज्यातील 18 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!



मुंबई : खरा पंचनामा

राज्य सरकारने शुक्रवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. सोनिया सेठी यांची मंत्रालयात महसूल व वने विभागाच्या (मदत व पुनर्वसन) प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे नवे निवासी आयुक्त व प्रधान सचिव म्हणून रुपिंदर सिंग यांची बदली करण्यात आली आहे.

नियुक्तीच्या प्रतिक्षेतील सोनिया सेठी यांची प्रधान सचिव  महसूल व वने (मदत व पुनर्वसन) येथे  जातपडताळणी समिती, वर्धाचे अध्यक्ष गोरक्ष गाडिलकर यांची संचालक, रेशीम संचालनालय; नागपूर येथे, जातपडताळणी समिती, नांदेडचे अध्यक्ष प्रकाश खपले यांची
 सहव्यव. संचालक, महाडिस्कॉम, औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.

औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, बीड जि.प. येथे, 
जात पडताळणी समिती, जळगावचे अध्यक्ष गुलाब खरात यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प; मुंबई येथे, पुणे जातपडताळणी समितीचे अध्यक्ष  डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची संचालक, बहुजन कल्याण, पुणे येथे तर गडचिरोली जातपडताळणी समितीचे अध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांची सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.

मुख्य भूसर्वे अधिकारी, सिडको, सतीशकुमार खडके यांची नाशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरण येथे, नाशिक महसूलचे उपायुक्त संजय काटकर यांची विभाग सहव्यव. संचालक, सिडको; नवी मुंबई येथे
उपायुक्त (महसूल) औरंगाबाद विभागचे पराग सोमण यांची सीईओ, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

आयुक्त वसई विरार महापालिका अनिलकुमार पवार यांची पदोन्नतीने आयुक्त, वसई विरार महापालिका येथे, व्यवस्थापकीय संचालक बियाणे महामंडळ अकोले सचिन कलंत्रे यांची  एम.डी. बियाणे महामंडळ अकोला (पदोन्नतीने) येथे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) कोकण मनोज रानडे यांची संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई, येथे बदली करण्यात आली आहे.

सहा. जिल्हाधिकारी, किनवट नेहा भोसले  यांची प्र. अधिकारी सहा. जिल्हाधिकारी, जव्हार येथे, सहा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर मुरुगंथम एम. यांची सहा. जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे, सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती रिचर्ड यंथन यांची सहा. जिल्हाधिकारी, धारणी, अमरावती येथे, 
सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद, यवतमाळ कार्तिकेयन एस. यांची सहा. जिल्हाधिकारी किनवट, नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.