Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांना मिळणार विशेष माफी!

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांना मिळणार विशेष माफी!





मुंबई : खरा पंचनामा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह सचिव, भारत सरकार यांनी 23 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये प्रस्तुत माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. विहित निकषामध्ये बसणाऱ्या राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या कैद्यांना प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी 206, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189 कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 कैद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. 

अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण 581 कैद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे. त्याबाबत या विभागाच्या 8 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये गृह मंत्रालय, भारत सरकार यांना कळविण्यात आले आहे. 

स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरूष बंदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 बंदी आहेत. तरूण गुन्हेगार 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 10 बंदी आहेत. हे बंदी माफी वगळता आहेत. निर्धन व दीन बंदी, ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 बंदी, तसेच ज्यांनी एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश अथवा 66 टक्के कालावधी पूर्ण करणारे 167 बंदी आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.