Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाईनद्वारे फसवणूक झालेली 20 कोटींची रक्कम गोठवली सांगलीच्या सायबर पोलिसांची कारवाई

ऑनलाईनद्वारे फसवणूक झालेली 20 कोटींची रक्कम गोठवली 
सांगलीच्या सायबर पोलिसांची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा 

अमुक-तमुक बँकेतून बोलतोय ओटीपी सांगा, वीज बील भरणा करण्यासाठी ओटीपी सांगा, असे सांगत सांगली जिल्ह्यातील अनेकांची ऑनलाईनद्वारे फसवणूक करण्यात आली आहे. मात्र गेल्या एक महिन्यात सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर सुमारे वीस कोटींची रक्कम गोठवण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दिली. 

ऑनलाइन गुंतवणुकीतून जादा पैशांचे आमिषासह यासह अनेक प्रकारे गंडा घातला जात आहे. त्यासाठी टेलिग्रामसह विविध सोशल मिडियाचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या सारा तपास तांत्रिक यंत्रणेद्वारे करण्यात आला आहे. सांगलीत गेल्या अनेक दिवसांत विविध मेसज, फोनद्वारे ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेकांची लुट करण्यात आली आहे. 

यात ताततडीने सायबर पोलिस ठाणे गाठणाऱ्यांना पोलिसांनी दिलासा दिला आहे. तात्काळ तांत्रिक तपास करून संबंधितांचे खाते गोठवत ती रक्कम तक्रारदारांना परत देण्यात आली आहे. आता सोशल मीडियावर जादा पैशाच्या आमिषाने अनेकांना गंडा घालण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अगदी किरकोळ रक्कम गुंतवण्यास सांगितली जाते. त्यानंतर जादा परतानाही त्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवली जाते. त्याचवेळी फसवणूक केली जाते. 

सांगलीतील काही लोकांनीही अशाच पद्धतीने पैशांची गुंतवणूक केली. ग्रुप बंद झाल्यानंतरच अनेकांना फसल्याचे समोर आले. त्यातील काहीजण सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील अनेकजण ‘टेलिग्राम ग्रुप’च्या जाळ्यात गुरफटले असल्याचे समोर आले आहे. अशी सुमारे वीस कोटींची रक्कम असल्याचेही तपासात समोर आल्यानंतर ती खाती गोठवण्यात आली आहेत. 

सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, श्रीधर बागडी, विवेक साळुंखे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी, रुपाली पवार, रेखा कोळी, सलमा इनामदार आदींनी या कारवाईत भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.