Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिखर बँकेत 25 हजार कोटींचा दरोडा टाकणाऱ्याला अटक करा!

शिखर बँकेत 25 हजार कोटींचा दरोडा टाकणाऱ्याला अटक करा!



मुंबई : खरा पंचनामा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, वसंतदादांचं सरकार पाडल्याचा दाखला देत सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं. याचाच धागा पकडत दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी ताई पाटील यांनी अमित शहांचे आभार मानत शिखर बँकेतील दरोडेखोरावर कारवाई करण्याची मागणी केलीये.

अमित शहा यांना माझी विनंती आहे की, तुम्ही माझ्या संस्थेची सुमारे 25 हजार सभासदांची मालमत्ता दिवसा ढवळ्या दरोडे घालून ज्या व्यक्तीने लुटून नेली. तो शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा दरोडेखोर ज्याला सुप्रीम कोर्टाने आरोपी ठरवलं आणि त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आम्ही एफआयआर दाखल केला, याला आता 4 वर्षे पूर्ण झाली. मात्र त्याचावर आता कोणतीही कारवाई न करता त्या आरोपीला पक्षात घेता इतकंच नाहीतर त्याला राज्याचा उपमुख्यमंत्री करता हा महाराष्ट्राच्या खुर्चीसह अपमान असून जनतेचीही निराशा केल्यासारखं आहे, असं शालिनी ताई पाटील म्हणाल्या.

शालिनीताई पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबतच, तुम्ही आरोपीला पक्षात येण्यासाठी निमंत्रण देत त्याला उपमुख्यमंत्री करत तुम्ही आमच्या दुःखावर फुंकर घालत आहात की मीठ चोळत आहात? हे काही कळत नाही. यावर खुलासा करावा. मला तुम्हाला दिल्लीत येऊन भेटता येणार नाही त्यामुळे तुम्ही मला यावर उत्तर द्यावं, असं शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.