उदगाव येथे गुटखा घेऊन जाणारी पिकअप जप्त : दोघांना अटक
28 लाखांचा मुद्देमाल जप्त : जयसिंगपूर पोलिसांची कारवाई
जयसिंगपूर : खरा पंचनामा
बोलेरो पिकअप जीपमधून गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 18 लाखांचा गुटखा, पिकअप असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उदगाव येथील टोल नाक्यावर जयसिंगपूर पोलिसांनी ही कारवाई केली.
संजय धोंडीराम माने (वय 47, रा. कोरोची, ता. हातकणंगले), राकेश रविंद्र मोरे (वय 30, रा. जांभळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पान मसाले, गुटखा, सुंगधी तंबाखु अशा उत्पादन, विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सोमवारी रोहित डावाळे, अमोल अवघडे यांना त्यांचे विश्वासू गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कर्नाटक राज्यातून जयसिंगपूर मार्गे बारामती येथे बोलेरो पिकअप मालवाहतुक गाडीतुन (MH 09 GJ 1266) गुटख्याची वाहतुक होणार आहे. त्यानंतर पथकाने उदगांव टोल नाका याठिकाणी नाकाबंदी करुन बोलेरो मालवाहतुक गाडी तसेच त्यातील दोघांना ताब्यात घेतले. गाडीची झडती घेतल्यानंतर हिरा कंपनीचा पान मसाला व सुंगधीत तंबाखु सापडली. त्यानंतर पथकाने गाडीसह मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली.
जयसिंपुरच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, अमित देशमुख, रोहित डावाळे, अमोल अवघडे, श्री. चौगुले, श्री. कांबळे, श्री. खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.