एक दिवस तुमचा, पण 364 दिवस आमचे!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि साउंड सिस्टीम मालकांची यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व साउंड ऑपरेटर चालक मालक यांना चांगलाच दम भरला. कायदा सर्वांना सारखाच आहे. त्याचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. एक दिवस तुमचा तर उरलेले 364 दिवस आमचेच आहेत. कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी या बैठकीत दिला. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे 'कोल्हापूर जिल्हा साउंड ऑपरेटर असोसिएशन'च्या वतीने बुधवारी सांगण्यात आले.
गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व साउंड मालक-चालक व ऑपरेटर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी साऊंड ऑपरेटर्सला कायद्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक आणि साउंड ऑपरेटर्स यांची बैठक कोल्हापुरातील अलंकार हॉल येथे झाली.
या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरव यांच्यासह आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी फक्त एक महिना बाकी असून सर्व गणेश मंडळ तयारीला लागले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनदेखील तयारीला लागले आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना विविध परवानग्या तसेच नियम घालून देण्यात आले आहेत. गणेश जयंती दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांविषयी नियम या बैठकीत सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.