सांगलीत दुचाकी चोरट्यास अटक अटक : 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 गुन्हे उघड : शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात दुचाकी तसेच दुचाकीचे सुटे भाग असा एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले आहे.
राहुल सुरेश काळोखे (वय 20, रा. कर्नाळ रस्ता, सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कर्नाळ रस्ता येथे एक युवक दुचाकीचे सुट्टया भागांचा वापर करुन दुचाकी तयार करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून संशयीत राहुल काळोखे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी त्याने त्याच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेडमध्ये ठेवल्याचे सांगितले. तेथे छापा टाकून पोलिसांनी सात दुचाकी जप्त केल्या. तसेच दुचाकीचे सुट्टे भाग आणि दुचाकी चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची पेटी ताब्यात घेतली.
त्याच्याकडून सांगली शहर पोलिस ठाण्याकडील पाच तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एक अशा सहा चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक महादेव पोवार, संदिप पाटील, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे, संदिप कुंभार, योगेश सटाले, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.