Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरीला गेलेले 4 लाखांचे दागिने केले परत! सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्याहस्ते दिला मुद्देमाल

चोरीला गेलेले 4 लाखांचे दागिने केले परत!
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्याहस्ते दिला मुद्देमाल



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे एका घरावर पडलेल्या दरोड्यातील आरोपींकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. चार लाख रुपये किमतीचे दागिने हे न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादींना सुपूर्त करण्यात आले. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याहस्ते हा मुद्देमाल देण्यात आला.

कवठेपिरान येथील रफिक दस्तगीर मगदूम हे विष्णू गल्लीत राहतात. त्यांची मुलगी तरन्नुम शिपा मुजावर ही सुट्टीसाठी माहेरी आली होती. मगदूम यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्यांनी बँकेतून रोकड काढून आणली होती. शिवाय, तरन्नुम हिनेही दागिने आणले होते. रात्री त्यांचे कुटुंबीय घरात झोपले होते. चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी प्रथम कपाटात ठेवलेले १५ तोळे सोने, रोकड लंपास केले होते. 

या घटनेत ८ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास झाला होता. दरम्यान, पोलिसांनी यातील एका अटक केली. त्याच्याकडून दरोड्यातील चार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले होते. ते दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार मुजावर कुटुंबियांना परत देण्यात आले. 

यावेळी सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सुशांत पाटील, उपनिरीक्षक किरण मगदूम, हवालदार मेघराज रुपनर, संतोष माने, सुशील मस्के उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.