60 हजारांची लाच घेताना दोन भूमापकाना अटक
औरंगाबाद : खरा पंचनामा
प्लॉटची सरकारी मोजणी करण्यासाठी 60 हजार रुपये लाच स्वीकारताना औरंगाबाद भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूमापक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सचिन बाबुराव विठोरे (वय 35), किरण काळुबा नागरे (वय 43) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन भूमापकांची नावे आहेत. तक्रारदार यांनी पिसादेवी रोड येथील प्लॉटचे सरकारी मोजणीसाठी अर्ज दिला आहे. दिलेल्या अर्जावर मोजणी केल्यानंतर केलेल्या मोजणीचा नकाशा तक्रारदार यांना देण्यासाठी नमूद दोन्ही भूमापक यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दोघांनी परस्पर 50 हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले. उर्वरित 60 हजार रुपयांची मागणी दोघांनी केली.
तक्रारदार यांनी याबाबत औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता भूमापक सचिन विठोरे व किरण नागरे यांनी प्लॉटची सरकारी मोजणी केल्यानंतर नकाशा देण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 60 हजार रुपये लाच घेताना किरण नागरे व सचिन विठोरे यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.