साहेब आणि दादा वेगळे नाहीत!
पुणे : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर दोन्ही पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गट (शरद पवार गट, अजित पवार गट) एकत्र येणार का याबाबत चर्चा सुरू आहे.
हे दोन्ही गट वेगळे नसल्याचे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजितदादा शिरुर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. दोन्ही गट वेगळं नाहीत, असे ते म्हणाले.
शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्रच असल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे. "साहेब आणि दादा तेव्हाही वेगवेगळे नव्हतो, आजही नाही, काळजी करु नका," असे अजित पवार म्हणाले.
"तरूणांनी राजकारण यावे," असे आवाहन अजित पवार यांनी केलं. "वडिलधाऱ्यांच्या आर्शीवार्दाने आणि मार्गदर्शनाखाली तरुणांनी राजकारण आणि समाजकारणात यायला हवं. त्यांनी शिकलं पाहिजे. पुर्वीपासून राजकारणात तरूणांमध्ये एक वेगळं आकर्षक आहे. त्यामुळे तरूणांचे प्रश्न सोडविण्यासाठी तरूणांनी सक्रिय राजकारण, समाजकारणात यायला पाहिजे," असं म्हणत अजित पवारांनी तरुणांना संधी देण्यासाठीचे संकेत शिरुरमध्ये दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.