पोलिस पत्नीसह मुलीचा खून करून एकाने केली आत्महत्या!
बुलढाणा : खरा पंचनामा
एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केला. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.
चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
किशोर कुटे असे या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. वर्षा दंदाले नाईट ड्युटी आटोपून सकाळी घरी परतल्या होत्या.
दुपारच्या सुमारास पतीने पत्नी आणि दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकूने सपासप वार करत दोघींचा खून केला. त्यानंतर स्वतःही अंढेरा शिवारात एका विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक खुनी थरारातून एक आठ वर्षाची मुलगी मात्र बचावली आहे. ती शाळेत गेली असल्याने तिचा जीव वाचला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.