Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हातकणंगलेतील उपनिबंधकाचा सांगलीतील फ्लॅट फोडला! आठ लाखांचा ऐवज लंपास

हातकणंगलेतील उपनिबंधकाचा सांगलीतील फ्लॅट फोडला!
आठ लाखांचा ऐवज लंपास



सांगली : खरा पंचनामा

शहरातील राम मंदिर परिसरातील बंद फ्लॅटचा फोडून चोरट्याने तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाखांच्या रोकडचा समावेश आहे. हातकणंगले येथे कार्यरत असणारे उपनिबंधक दिलीप मनोहर काळे यांचा हा फ्लॅट आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत काळे यांनी फिर्याद दिली आहे. दिलीप काळे हातकणंगले येथे उपनिबंधक आहेत. ते सांगलीतील राममंदिरजवळील प्रणाम आर्केड या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये रहातात. काल सकाळी अकराच्या सुमारास ते कामानिमित्त फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास परत आले असता त्यांना घराचे कुलूप उघडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. 

चोरट्याने बनावट किल्लीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याच्या ऐवज चोरून नेला. यामध्ये सात तोळ्यांचे २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे गंठण, पाच तोळ्याचा १ लाख ७५ हजार रुपयांचा सोन्याचा साज, दोन तोळ्यांचा ७० हजार रुपयांचा नेकलेस आणि तीन लाखांची रोकड असा ७ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत काळे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.