दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाचा खून!
माधवनगर-कर्नाळ रस्त्यावरील घटना : संशयित ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
दारूसाठी पैसे न दिल्याने एका वृद्धाचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री सात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. खुनाची माहिती मिळताच एलसीबी तसेच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अनिल देसाई (वय २३, रा. शनिवार पेठ, माधवनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. सुनील श्रीरंग तरटे (वय ६५, रा. शनिवार पेठ, माधवनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृत सुनील यांचा मुलगा गणेश तरटे (वय २४) याने फियार्द दिली आहे. संशयित विशाल देसाई आणि मृत सुनील तरटे माधवनगर येथील राजगुरूनगर झोपडपट्टी येथे राहतात.
शुक्रवारी रात्री विशालने मृत सुनील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सुनील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विशालने डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृणपणे खून केला. याची माहिती मिळताच सांगली शहरचे उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, संतोष माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयित विशाल देसाई याला ताब्यात घेतले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सहायक निरीक्षक सुशांत पाटील अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.