यंदा महाराष्ट्र पोलिसांना एकही पदक नाही!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
गृहमंत्रालयाने 2023 मध्ये उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली. त्यामध्ये यंदा राज्य पोलिंसासह मुंबई पोलिसांना एकही पदक मिळाले नाही. देशभरातील 140 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली.
महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले. मात्र महाराष्ट्राला यंदा पदकं मिळाले नाहीत. यंदा सर्वाधिक 15 पदकं सीबीआयला तर 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पोलिसांना 11 पदकं मिळाली होती. मात्र यंदा एकही पदकं मिळाली नाही. यंदा 140 पदकं विविध विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. मात्र महाराष्ट्रात एकाही अधिकाऱ्यांचे यात नाव नाही.
2023 साठी "केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपासासाठी" 140 पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 15 सीबीआय, 12 एनआयए, 10 उत्तर प्रदेश, 09 केरळ आणि राजस्थान, 08 तामिळनाडू, 07 मध्य प्रदेश आणि 06 गुजरात आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. यामध्ये 22 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.