परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना अटक!
पुणे : खरा पंचनामा
नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी शिक्षण विभागात पैशाच्या मोबदल्यात नोकरीचे आमिष दाखवल्याने दराडे याना निलंबित करण्यात आले होते.
त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते. परंतु नोकरी न लावता फसवणूक केली. त्यावेळी शैलजा दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त होत्या. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. याबाबत पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते. प्राथमिक चौकशीत शैलजा दराडे दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपुर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.