Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याची साखर केली हडप : सांगलीत दोघांवर गुन्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याची साखर केली हडप : सांगलीत दोघांवर गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातील साखर अहमदनगर येथे पोहोच करण्याचे कंत्राट मिळवून 7 लाख 48 हजार 650 रुपये किंमतीची 20 टन साखर परस्पर हडप करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत नंदकिशोर तोडकरी (रा. जामखेड, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक शरीफखान बाबू खान (रा. नवासारी रोड, सुरत, गुजरात) आणि ट्रक मालक राजुभाई सोलंकी (रा. डोलीनोपत, राजुला, जि. अमरेली, गुजरात) यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावर शहानबाज जावेद शेख यांचा चिंतन रोडवेज नावाने रोड ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अमहदनगरमधील किराणा स्टोअर्सचे मालक वसंत तोडकरी यांनी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू कागल सहकारी साखर कारखान्यातून 20 टन साखर मागविली होती. हे साखर पोहोच करण्याची जबाबदारी चिंतन रोडवेजकडे होती. कोल्हापूर ते अमदनगर येथे साखर पोहोच करतो असे सांगून वरील दोघा संशयितांनी ट्रकची कागदपत्रे चिंतन रोडवेजकडे देउन कोल्हापूर येथून 20 टन साखर ट्रकमध्ये भरली. परंतु संबंधित साखर अहमदनगर येथील वसंत तोडकरी यांच्यापर्यंत पोहोच न करता ती परस्पर हडपली. 

साखर न मिळाल्याने वसंत तोडकरी यांनी चौकशी केली असता साखर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांच्या फिर्यादीनुसार सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.