पेठ-सांगली रस्त्यासाठी इस्लामपुरात राष्ट्रवादीचे रस्ता रोको!
इस्लामपूर : खरा पंचनामा
इस्लामपूर-कामेरी रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने सुरु करावे, तसेच गँस पाईपलाईनसाठी रस्ता खुदाई केल्याने दुरावस्था झालेल्या पेठ-सांगली रस्त्याची सुरुस्ती करावी. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु करु असे आश्वासन सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, भगवान पाटील, माजी नगरसेव खंडेराव जाधव, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पेठ-सांगली रस्त्यावर ठिय्या मारुन रस्ता रोकण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.