Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस चौकीतच पत्त्यांचा डाव : तिघे पोलिस कर्मचारी निलंबित

पोलिस चौकीतच पत्त्यांचा डाव : तिघे पोलिस कर्मचारी निलंबित



नागपूर : खरा पंचनामा

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या लाकडीपूल येथील पोलिस चौकीत पत्ते खेळणाऱ्या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांमुळे अगोदरच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

त्यातच पत्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा आणखी खराब झाली आहे. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आनंद काळे, फिरोज शेख व रवी करदाते अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे.

लाकडीपूल येथील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पोलिस चौकीत हा प्रकार पहायला मिळाला. दुपारी १२ वाजल्यापासून चौकीच्या मागील भागात बांधलेल्या टीन शेडखाली तीन पोलिस कर्मचारी टेबलावर पत्ते खेळू लागले. याची माहिती बाहेरच्या काही लोकांना मिळाली. या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ काढण्यात आला व तो व्हायरल झाला. पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी या कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.