उमदीतील रमेश खरात टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
सांगली : खरा पंचनामा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रमेश खरात याच्या टोळीतील चौघांना दोन वर्षांसाठी सांगली, सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.
रमेश यशवंत खरात (वय २४, रा. तिकोंडी, ता. जत), तानाजी आमसिद्धा करे (वय २६, रा. तिकोंडी), महादेव ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे (वय २०, रा. भिवर्गी) संभाजी बिराप्पा शेंडगे (वय २२, रा. तिकोंडी) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर २०१९ पासून बेकायदा जमाव जमवून घातक हत्याराने दुखापत करणे, गर्दी मारामारी, मालमत्तांचे नुकसान, गौणखनिजाची चोरी, असे एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यापासून नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका असल्याने उमदीचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
या प्रस्तावाबाबत जतचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आला होता. त्यांचा चौकशी अहवाल तसेच याबाबत सलग सुनावणी घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी या टोळीला सांगली, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, छाया बाबर आदींनी या कारवाईत भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.