वाळू तस्करी करणारा हायवा डंपर, ट्रॅक्टर जप्त!
दोघांना अटक, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त : चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील बोरगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी वाळूने भरलेला एक हायवा डंपर, ट्रॅक्टर असा १८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. चकलांबा पोलिसांनी या तस्करांचा थरारक पाठलाग करून ही दोन्ही वाहने पकडल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कोंडीराम भोसले (रा. मुंगी, ता. शेवगाव), फयास गुलाब शेख (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) अशी अटक केलेल्या चालकांची नावे आहेत. चकलांबा पोलिस ठाण्याचे एकशिंगे यांनी अवैध व्यवसायांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांना बोरगाव येथे गोदावरी नदी पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी रात्री पथकाला अवैधरित्या वाळू वाहतूक करताना एक हायवा डंपर, एक ट्रॅक्टर आढळून आला.
त्यावेळी पथकाने या दोन्ही वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहने वेगाने निघून गेली. त्यानंतर पथकाने थरारक पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला. तर डंपरचा चालक गाडी तेथेच सोडून पळून गेला. पोलिसांनी वाळूने भरलेली दोन्ही वाहने जप्त केली. तर पळून गेलेल्या डंपरच्या चालकाला आज अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इंगळे, तुकाराम पवळ, कैलास खाटणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.