पुण्यात ५०.६५ कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त!
पाच जणांना अटक : डीआरआयची कारवाई
पुणे : खरा पंचनामा
केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पुण्यातून तब्बल १०१ किलो वजनाचा अंमली पदार्थाचा साठा एका वाहनातून जप्त केला आहे. याची किंमत ५० कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथून महाराष्ट्रात येणाऱ्या एका वाहनात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेलंगणा राज्याची वाहन नोंदणी असलेले हे वाहन पुण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ते थांबवत त्याची तपासणी केली.
त्यावेळी त्यामध्ये एक मोठे पिंप आढळून आले. त्या पिंपामध्ये हा अंमली पर्दाथांचा साठा ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पाचजण महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, हैदराबाद येथील रहिवासी असून ते आंतरराज्यीय रॅकेट चालवत असल्याचा डीआरआयला संशय आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.