क्रमांक एकचा आणि दोनचा उपमुख्यमंत्री कोण?
मुंबई : खरा पंचनामा
विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांसह विरोधकांमधील सर्व प्रमुख नेत्यांनी भाषणं केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली.
जयंत पाटील म्हणाले, विरोधीपक्ष नेत्यांचं महत्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांकडं लक्ष देण्याऐवजी विरोधीपक्ष नेत्यांसंदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. यावर अजित पवार म्हणाले, आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडं आहे पण तुमचचं आमच्याकडं लक्ष नाही त्यावर मी काय करु. अजितदादांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
मुख्यमंत्री विचलित न होता सर्वांची भाषणं ऐकत आहेत. पण दोन उपमुख्यंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण? आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण? अशा शब्दांत जयंत पाटलांनी सभागृहात चांगलीच टोलेबाजीही केली.
विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढाऊ नेते आहेत. विरोधीपक्षाची आमदार म्हणून कामगिरी त्यांनी कामगिरी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली. यावेळी झुंजार व्यक्तीमत्व या ठिकाणी बसणं आवश्यक होतं आणि विरोधीपक्षाच्यावतीनं मला वाटतं एक झुंजार आणि खंबीर नेता आज तिथं बसला आहे. महाराष्ट्राच्या समोर बरेच प्रश्न आहेत त्याला ते योग्य न्या देतील, असंही यावेळी पाटील म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.