Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कळव्यातील मृत्यू तांडव थांबेना : आज चौघांचा मृत्यू!

कळव्यातील मृत्यू तांडव थांबेना : आज चौघांचा मृत्यू!



ठाणे : खरा पंचनामा

गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आजही या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला असताना, सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती दिली गेली आहे. तर एक रुग्ण मृत अवस्थेत आणण्यात आला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच एक रुग्णावर मेडिकल उपचार सुरू होते. एक आयसीयूमधील रुग्णाचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.