सांगलीतील तीन दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या
सांगली : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील (स्टेट एक्साईज) तीन दुय्यम निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तीनही बदल्या मुदतपूर्व विशेष विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सहीने शुक्रवारी काढण्यात आले आहेत.
विटा येथील दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील यांची इस्लामपूर येथे बदली करण्यात आली आहे. इस्लामपूर येथील सुनील पाटील यांची तासगाव येथे बदली करण्यात आली आहे. तर तासगाव येथील दुय्यम निरीक्षक श्रीमती माधवी गडदरे यांची विटा येथे बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.