घरातील वाद घरात संपावा, हीच इच्छा!
सांगली : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून हा घरातील वाद घरातच संपावा, याच भावनेतून मी प्रयत्न करत आहे. पण, त्याला अजूनही यश आलेले नाही. पण, वादाचा न्यायनिवाडा झाला नाही, तर आयोगाकडून नक्कीच होईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत व्यक्त केले.
शरद पवार-अजित पवार भेटीबाबत पाटील यांनी हा खुलासा केला. हे सांगत असताना राज्यातील महाविकास आघाडी खंबीर आणि एकसंघ आहे, असेही त्यांनी सांगितले. पक्षी संग्रहालयाच्या भूमीपूजनासाठी शपाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार, अजित पवार भेटीबाबत ते म्हणाले, राजकारणात बेरीज करायची असते. भागाकार, वजाबाकी होऊ नये, याची दक्षता पक्षाच्या अध्यक्षांनी घ्यायची असते. पक्षातील फुट टाळण्याची आम्ही प्रयत्न करीत आहोत. पक्षातील अनेकजण प्रयत्नशील आहेत. पण त्याला यश आलेले नाही. शरद पवार यांची भूमिकाही स्पष्ट आहे. त्यामुळे कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहे. मध्यंतरी भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या. पण असा पक्ष बदलता येतो का? मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. लोक बोलत असतात. लोकशाहीत सर्वांनीच चांगले बोलले पाहिजे, अशी अपेक्षा चुकीची आहे. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.