Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाळू तस्करी करणारे दोन हायवा डंपर, ट्रॅक्टर लोडर जप्त चौघांना अटक, ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त : चकलांबा पोलिसांची कारवाई

वाळू तस्करी करणारे दोन हायवा डंपर, ट्रॅक्टर लोडर जप्त
चौघांना अटक, ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त : चकलांबा पोलिसांची कारवाई 



बीड : खरा पंचनामा 

बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदी पात्रातून वाळू चोरून त्याची तस्करी करणारे दोन हायवा डंपर, दोन ट्रॅक्टर लोडर असा ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली. 

शेरखान बाबू पठाण (वय ३५, रा. घोडका राजुरी), शेख शाबेर शहाबुद्दीन (वय २२, रा. नांदुर हवेली), प्रदीप अंकुश पोटफोडे (वय ३०, रा. राक्षसभुवन), महेश भालचंद्र कोंढरे (वय ३५, रा. राक्षसभुवन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अजय सखाराम कोंढरे, बाळासाहेब तात्यासाहेब नाटकर हे दोघे पळून गेले. शनिवारी सकाळी चकलांबा पोलिसांनी ही कारवाई केली. 

राक्षसभुवन येथे गोदावरी नदी पात्रातून काहीजण वाळू चोरी करून त्याची तस्करी करत असल्याची माहिती सहायक निरीक्षक एकशिंगे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी चौघांना वाळू चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. तर पोलिसांना पाहून दोघेजण पळून गेले. यावेळी पोलिसांनी दोन हायवा डंपर (क्र. एमएच १५ एफव्ही ६३९०, एमएच ४४ ९१३२), दोन लोडर ट्रॅक्टर (क्र. एमएच २३ बीएच १४८६, एमएच २१ बीव्ही ४८४५) असा ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, श्री. तिपाले, श्री. येळे, श्री. खटाणे, श्री. पवळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.