मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जूनला ईडीने मारलेल्या छापात्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांचा समावेश होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.