Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पोलिसांनी जप्त केलेला सव्वा कोटींचा गांजा नष्ट!

सांगलीत पोलिसांनी जप्त केलेला सव्वा कोटींचा गांजा नष्ट!



सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यातील विविध ११ पोलिस ठाण्यात १९९८ ते २०२२ या काळात ४५ गुन्ह्यांत जप्त केलेला १ कोटी २० लाखांचा १ टन २०५ किलो ३२२ ग्रॅम वजनाचा गांजा नष्ट करण्यात आला. पलूस तालुक्यातील एका कंपनीत अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. न्यायालयासह विविध विभागांची परवानगी घेऊन ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील ११ पोलीस ठाण्याकडील एन.डी.पी.एस. अॅक्ट लागवड, वाहतुक, विक्री, सेवन अशा गुन्हयातील मुद्देमाल केंद्रीय अंमली पदार्थ गोडाउन मध्ये जमा करण्यात आला होता. एलसीबीने जप्त गांजाबाबत न्यायालयात व पोलिस ठाण्यात पाठपुरावा करून ११ पोलीस ठाण्यातील ४५ गुन्हयातील मुद्देमाल नाश करण्याचे आदेश प्राप्त केले. तसेच दहशत विरोधी पथकाचे महासंचालक, सीआयडी, पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची परवानगी घेतली. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हयात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समिती स्थापन केली. त्या समितीच्या परवानगीने गांजा नष्ट करण्यात आला. 

जत पोलिस ठाण्याकडील १३, उमदी ५, मिरज ६, महात्मा गांधी चौक ५, सांगली शहर ७, सांगली ग्रामीण २, विटा ३, कासेगांव १, तासगांव १, कवठेमहांकाळ १, मिरज ग्रामीण १ अशा वेगवेगळया ११ पोलिस ठाण्यांकडील ४५ गुन्हयातील गांजाचा समावेश होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.