पोलिस, पत्रकार असल्याचे सांगून लुटणाऱ्या टोळीला अवघ्या चार तासांत अटक!
चकलांबाचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांची माहिती
बीड : खरा पंचनामा
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात महामार्गावर लुटणाऱ्या टोळीला अवघ्या चार तासांत अटक करण्यात आली. चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीमधील फुलसांगवी या गावातून मार्केटिंगसाठी जाणारा औरंगाबाद जिल्ह्यातील टेम्पो (क्र. एमच 20 ईएल 5570) तिघांनी अडवला. त्यानंतर चालकाला पत्रकार आणि पोलीस असल्याचे सांगून जबरदस्तीने 1800 रुपये काढून घेतले. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. त्यानंतर घाबरलेल्या विष्णू शेषराव सुरवसे (रा सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांनी सोमवारी चकलांबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक निरीक्षक एकशिंगे यांनी तात्काळ पथक पाठवले. तात्काळ संशयितांचा शोध घेऊन, त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इंगळे, हवालदार बारगजे, मिसाळ, घोंगडे यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.