लिफ्ट इरिगेशनचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक
विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील हिंगणगादे लिफ्ट इरिगेशन स्कीमचे साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिकअप, तीन मोटारी, पाईप असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सचिन हिंदुराव मदने (वय 23), शुभम पोपट जाधव (वय 20), आकाश संभाजी भाट (वय 19, सर्व रा. हिंगणगादे, ता. खानापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हिंगणगादे इरिगेशन स्कीमचे साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद विटा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. निरीक्षक श्री. डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पथक माहिती घेत असताना ही चोरी त्या तीन संशयितांनी केल्याची माहिती खबऱयाद्वारे मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी, तीन मोटारी, पाईप असा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल जाधव, प्रशांत चव्हाण, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, सोमनाथ पाटील, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.