तासगावची संताजी शिंदे टोळी हद्दपार
पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संताजी शिंदे टोळी सांगली जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे. टोळीवर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही कारवाई केली.
संताजी उर्फ बाळू पांडुरंग शिंदे (वय २६) आणि अरविंद अशोक चौगुले (वय ५५, रा. दोघेही बलगवडे, ता. तासगाव) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. तासगाव तालुक्यात २०२२-२३ या कालावधीत टोळीतील दोघांवर हत्याराने गंभीर दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून घरात घुसून मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्यांची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधीक्षक डॉ. तेली यांनी दिले होते.
त्यानुसार तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी प्रस्ताव तातडीने सादर केला. त्यानुसार अधीक्षक डॉ. तेली यांनी कारवाई केली. दोघानाही एक वर्षाकरिता सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक वाघ, श्रेणी उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, अंमलदार दीपक गट्टे, तासगाव पोलिस ठाण्यातील अभिजीत गायकवाड, निलेश ढोले यांचा कारवाईत सहभाग होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.