...अन शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या पाठीवर थाप मारली!
पुणे : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात आला.
मोदींच्या दौऱ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होत असला तरी प्रत्यक्षात मंचावर वेगळाच प्रसंग बघायला मिळाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा एसपी कॉलेज मैदानाकडे निघाला. कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहात मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते. मोदी मंचावर दाखल झाल्यानंतर ते सरळ शरद पवार यांच्याकडे गेले.
दीपक टिळक यांच्या बाजूला शरद पवारांची आसन व्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. त्यावेळी बाजूला असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलले होते.
दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील हास्य लपून राहले नव्हते. शिवाय पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप दिल्याने चर्चांना उधाण आलेले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.