जेनेरिक औषधांच्या वापराबाबतच्या नियमावलीला अखेर स्थगिती!
मुंबई : खरा पंचनामा
केंद्र सरकारने नोंदणीकृत डॉक्टरांच्या आचरणासंदर्भात २ ऑगस्ट २०२३ रोजी नियमावली जाहीर केली होती. डॉक्टरांनी रुग्णांना फक्त जेनेरिक औषधच लिहून द्यावे, अन्यथा त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, यासह अनेक निर्बंध या नियमावलीत लादण्यात आले होते.
देशभरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी या नियमावलीलाच कडाडून विरोध केला होता. अखेर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ही नियमावली पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने डॉक्टरांच्या आचरणासंदर्भात नव्याने तयार केलेली नियमावली २ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात आली. या नियमावलीमध्ये डॉक्टरांनी रुग्णांना फक्त जेनेरिक औषधेच लिहून द्यावी, अन्यथा त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच डॉक्टरांच्या संघटनेने आयोजित केलेल्या सभेला औषध निर्माता कंपनीने निधी उपलब्ध केला असेल, तर त्याला डॉक्टर उपस्थित राहू शकत नाहीत, अशा अनेक नियमांचा त्यात समावेश होता.
नियमावलीतील काही नियम तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने देशातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी त्याला कडाडून विरोध केला होता. नव्या नियमावलीला डॉक्टरांचा वाढता विरोध लक्षात घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने अखेर २३ ऑगस्ट रोजी ही नियमावली पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचवेळी नवीन नियमावली जाहीर होईपर्यंत मागील नियमावली डॉक्टरांना लागू राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.