राजू शेट्टींनी घेतली गडकरींची दिल्लीत भेट!
इथेनॉल, साखर किंमत, कोल्हापूर-सांगली रस्त्याबाबत चर्चा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी इथेनॉल, साखरेची किंमत यासह कोल्हापूर-सांगली महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शेट्टींनी शेती प्रश्नाच्या विविध मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच इथेनॉलच्या किंमत वाढीसह साखर निर्यातीच्या धोरणावर केंद्र सरकारनं मार्ग काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टींनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
नितिन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी राजू शेट्टींनी त्यांची भेट घेतली. साखर उद्योगाबरोबर, राष्ट्रीय महामार्गांची सुरु असलेली कामं, राज्यातील राजकीय घडामोडी, देशामध्ये ऊस उत्पादक शेतकरी वगळता केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस, कांदा, धान उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी संकटात आर्थिक संकटात सापडले आहेत. नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नामुळं केंद्र सरकारनं इथेनॉलचे धोरण स्थिर केल्यामुळं साखर कारखानदारांना थोडे चांगले दिवस आल्याचे शेट्टी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.