डॉक्टर्स फार्मा कंपन्यांकडून भेटवस्तू स्वीकारू शकत नाही!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून डॉक्टरांसाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर आता हिंसक रुग्णांचा उपचार करण्यासाठी नकार देऊ शकतात. याशिवाय डॉक्टर कोणत्याही औषधाची किंवा कंपनीची जाहिरात करू शकणार नाही. असे प्रकरण समोर आल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द होऊ शकतो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिसूचनेद्वारे हे नवीन नियम देशभर लागू करण्यात आले आहेत.
या नियमांनुसार, डॉक्टर हिंसक रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ शकतात, परंतु असे केल्याने त्या रुग्णाच्या जीवाला धोका होणार नाही हे डॉक्टरांनी पाहिले पाहिजे. नॅशनल मेडिकल कमिशनने जवळपास वर्षभरापासून प्रलंबित नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक आचरण नियमनाबाबत अधिसूचना जारी केली. यामध्ये समाविष्ट केलेले नवीन नियम गेल्या दोन ऑगस्टपासून देशभर लागू करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार डॉक्टर किंवा त्यांचे कुटुंबीय फार्मा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू, प्रवास सुविधा, रोख रकम किंवा आर्थिक अनुदान स्वीकारू शकत नाही, असे आढळल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द होऊ शकतो. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टर कोणत्याही फार्मा कंपनीशी संबंधित असलेल्या सेमिनार, कार्यशाळा, सेमिनार किंवा कॉन्फरन्स यासारख्या तृतीय पक्षीय शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, डॉक्टर कोणत्याही परिस्थितीत भेटवस्तू स्वीकारू शकत नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.