सीबीआयच्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांची आत्महत्या!
नवी मुंबई : खरा पंचनामा
नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले. छापेमारी झाल्यावरच दुसऱ्याच दिवशी कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांनी आपलं जीवन संपवलं मयंक यांनी तळोजामधील एका तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक सिंग यांच्याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. कस्टमकडे प्रलंबित असणारी २ बिले मयंक यांनी लाच घेऊन क्लिअर केल्याचा आरोप होता. मयंक सिंग यांच्या आत्महत्येनंतर खारघर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी खारघर येथील तळोजा मध्यवर्ती तुरुंगालगतच्या तलावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. हा तरुण कोण? याचा तपास खारघर पोलीस करत होते. अखेर मृत व्यक्तीची ओळख पटली. या मृत व्यक्तीचे नाव मयंक सिंग असे असून ते तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या व्हॅलीशिल्प सोसायटीत राहत होते.
पोलीसांच्या तपासात मयंक यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सूरु असल्याचे उघडकीस आले. याविषयी तपास सूरू असल्याने लगेच यावर बोलणे योग्य होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी सांगीतले. मयंक यांची गाडी त्यांनी तलावापासून काही अंतरावर उभी केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.