सांगलीत पत्ता विचारणाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना अटक!
सांगली : खरा पंचनामा
पत्ता विचारणाऱ्याला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम लुटण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
मलीक दस्तगीर मुलाणी (वय २८ रा. इदगाह मैदान समोर, सांगली), चंदु शोभा मुरमन (वय २२, रा. गांधी पोलीस चौकीसमोर, मिरज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सक्षम चंद्रकांत यादव (रा. विटा, ता. खानापूर) याने फिर्याद दिली.
रविवार २० रोजी रात्री शहरातील टिंबर एरिया मार्गे सक्षम यादव मित्रासह परगावी निघाला होता. यावेळी संशयित एका चौकात थांबले होते. सक्षम पत्ता विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेला. त्यावेळी संशयितांनी सक्षमला लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेवून पलायन केले. याबाबत सक्षम यादव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान पोलीस गस्त घालत असताना दोघे संशयित सापडले. त्यांना ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.