'प्री इंडिपेंडेंस डे' कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'प्री इंडिपेंडेंस डे' कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुण्यातील कोरेगाव पार्क येथील फ्रिक सुपर क्लब येथे घडली. याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर फ्रिक सुपर क्लब येथे 'प्री इंडिपेंडेंस डे' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुझिकल कॉन्सर्ट दरम्यान एका गायकानं मंचावर गाणं सादर करत असताना हातातील देशाचा तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला. याबाबत अॅड. आशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.