Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन नाहीच!

ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन नाहीच! 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अखेरचा निर्णय आणि सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून येणं बाकी आहे. 

31 जुलैला मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंहने एआर-एम1 रायफलने केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारच्या घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्ट रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना AK47 किंवा AR गन यांसारखे स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असून त्यानंतर सर्क्युलर जारी होईल. आता सामन्य मार्गावरील ट्रेनमध्ये कर्मचाऱ्यांकडे अशी ऑटोमॅटिक हत्यारं नसतील. मात्र जे संवेदनशील ठिकाणं आहे, जिथे नक्षलवादी किंवा इतर प्रकारच्या गुन्हेगारांद्वारे ट्रेनला लक्ष्य केलं जाण्याची शंका असते तिथल्या मार्गांवर आवश्यकतेनुसार डिप्लॉयमेंट असेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.