छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट, युवकांनी रोखला सातारा-पंढरपूर महामार्ग!
सातारा : खरा पंचनामा
सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रकार सातारा जिल्ह्यात घडला. हा प्रकार निंदनीय असून हजारो युवकांनी आज गुरुवारी संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले. या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी थांबवावी अशी मागणी करत आंदोलनास प्रारंभ केला.
यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी तसेच काही युवकांनी प्रशासनास निवेदन दिले. शिवरायांबद्दल समाज माध्यमातून केली जाणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
दरम्यानच्या काळात हजारो युवक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले होते. या युवकांनी रास्तो रोको करुन संबंधितावर कठोर कारावाई होत नाही तोपर्यंत रस्त्यावरच बसून राहणार अशी भूमिका घेतली. यामुळे पोवई नाका परिसरातील वाहतुकीवर ताण पडला. पोलिसांनी युवकांना आश्वासित करीत शांतता राखण्याचे आवाहन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.