मुंबईत जीएसटी अधिक्षकाला लाच घेताना सीबीआयने केली अटक!
मुंबई : खरा पंचनामा
सीबीआयने जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. यावेळी सीबीआयने सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हेमंत कुमार असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
फियार्दीने सांगितल्यानुसार, कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरण निपटवण्यासाठी 30 लाख रुपयांचा अवाजवी फायदा मागितल्याच्या आरोपावरून सीजीएसटी अधीक्षक हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींने लाच म्हणून 15 लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेचा पहिला हप्ता घेताना या अधिकाऱ्याला सीबीआयने रंगेहात अटक केली.
यानंतर मुंबई, गाझियाबाद येथील आरोपींच्या कार्यालय आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये 42.70 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला आज सीबीआयच्या विशेष न्यायाधीश, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.