सांगलीत तरुणाला मारहाण करून लुटली सहा लाखांची रोकड!
सांगली : खरा पंचनामा
शहरातील कुपवाड ते लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेट्रोल पंपानजीक दोघांनी पाठलाग करुन एका तरुणाला मारहाण करत त्याच्याकडील सहा लाखांची रोकड लंपास केली. त्यानंतर त्याचीच दुचाकी घेवून संशयितांनी पलायन केले. ही घटना दि. २४ रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुरज काळे (रा. जुना बुधगाव रस्ता, यल्लम्मा मंदिरानजीक, कुपवाड) आणि अन्य एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अक्षय संपत सूर्यवंशी (रा. जुना बुधगाव रस्ता, अजिंक्यनगर, कुपवाड ) यांनी फिर्याद दिली आहे.
अक्षय सूर्यवंशी यांचा मूर्तीकाराचा व्यवसाय आहे. दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरुन (क्र. एमएच १० डी एफ ११५१) जात असता अगोदरपासून पाळतीवर असणाऱ्या संशयीत सुरज काळे याने साथीदारामवेत येवून त्याची दुचाकी (एमएच १० सीई ३०१३) आडवी मारली आणि सूर्यवंशी यांना खाली पाडले. यावेळी संशयीतांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली. तसेच दुचाकीच्या डिकीत असलेले ६ लाख रुपये काढून घेतले. नंतर सूर्यवंशी याची दुचाकी घेवून तेथून पळून गेले. संशयीतांनी त्यांची दुचाकी घटनास्थळीच सोडली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.