अल्पवयीन मुलीला मारहाण करून केले अत्याचार : तरुणावर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात एका तरुणावर बलात्कार, मारहाण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना तीन महिन्यांपूर्वी १५ मे रोजी सांगलीतील एका महाविद्यालयाच्या परिसरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित अल्पवयीन मुलगी मिरज तालुक्यातील एका गावामध्ये राहते. संशयित तरुण तिच्याच गावचा आहे. त्यामुळे त्यांची ओळख होती.
१५ मे २०२३ रोजी संशयित तरुणाने सायंकाळी जबरदस्तीने मुलीस त्याच्या मोटारसायकलवर बसवले. सांगलीतील एका महाविद्यालयाच्या परिसरातील निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी पीडिता विरोध करत असतानाही जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. यानंतर पीडित तरुणीला मारहाण करत शिवीगाळ करून तो निघून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तरुणाच्या गुन्हा दाखल केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.