सत्ताधाऱ्यांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न!
सांगली : खरा पंचनामा
महात्मा गांधी यांच्याबद्दल ७५ वर्षानंतर वक्तव्य करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. निवडणुका जवळ आल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जातीयतेढ निर्माण होवून संघर्ष व्हावा, असा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याचे वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगलीतील महापालिकेच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
ठाणे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखान्याकडे आधी बघावे. त्यात सुधारणा कराव्यात. ते नक्कीच ही बाब गांभीर्याने घेतील, असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.